मराठी

मेहेर बाबा
(This content has been taken from Wikipedia, Marathi. This is only a test information) मेहेर बाबा (फेब्रुवारी २५, इ.स. १८९४ – जानेवारी ३१, इ.स. १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.[१][२] पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.[३] नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. [४] १० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.